फॉलोअर

बुधवार, १४ मे, २०२५

लग्नसराईत लपलेला धोका: वर्धा लव्ह जिहाद स्टोरी

लग्नसराईत लपलेला धोका: वर्धा लव्ह जिहाद स्टोरी



लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला सर्वांगसुंदर असा प्रसंग असतो. सध्या उन्हाच्या तडाख्यातही लगीनसराई किती धुमधडाक्यात सुरू आहे, हे आपण रोज अनुभवतो आहोत. किंबहुना लग्न म्हंटलं की, आधी आपण पोहोचतो ते फोटोग्राफर्सकडे. कारण फोटोग्राफर्सच्या नजरेतून आपण आपल्या लग्नाच्या आठवणी जपून ठेवत असतो. पण याच फोटोग्राफीच्या आडून कुणीतरी आपल्या लग्नात अचानक शिरतं, फॉटोग्राफरच्या टीममध्ये आहे सांगून आपल्या लग्नात आलेल्या मुलींचे संधी साधून फोटो काढत असतं आणि मग त्या फोटोचा वापर करून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं जातं आणि सुरू होतो लव्ह जिहाद! होय थेट विषयावर हात घालतेय, कारण मी इथून पुढे तुम्हाला जे काही सांगणार आहे, ती निव्वळ मनोरंजन किंवा रंजकता निर्माण करणारी करणारी गोष्ट नाही. तर ती एक सत्य घटना आहे मागच्या १५ दिवसांत घडलेली!

केरला स्टोरी हा चित्रपट आपण बघितला. कित्येकांनी त्यावर प्रचंड टीका केली, banned करण्यासाठी प्रयत्न केले. असे चित्रपट मानसिकतेवर परिणाम करतात म्हणे. अर्थात ते आरोप करणारे हेच असावे ज्यांचे काळे धंदे केरला स्टोरी सारख्या चित्रपटांमुळं नजरकैदेत येतात. पण केरलाच काय, आपला महाराष्ट्र सुद्धा या सावटापासून सुरक्षित नाही याची साक्ष देतो वर्ध्यातील एका लग्नातील अतिप्रसंग!

अलीकडेच वर्धा जिल्ह्यात घडलेली एक घटना याचं ज्वलंत उदाहरण आहे. ही घटना ऐकून मन सुन्न होतं. एक फोटोग्राफर असल्याचं भासवून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने लग्नात आलेल्या तरुण मुलींचे फोटो काढले. या फोटोचा वापर करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू होता – आणि यामागे होतं लव्ह जिहादचं मोठं जाळं.

विदर्भातील वर्धा हे शहर सर्वांनाच परिचयाचं आहे. कारण महात्मा गांधी यांनी आपला सेवाग्राम आश्रम इथे स्थापन केला. याच वर्ध्यातील एका हॉलमध्ये लग्नविधी सुरू होते. लग्न म्हंटलं की नटणं हे आलंच. त्यामुळं तरुण मुली नटून थटून फोटो काढण्यात गुंग होत्या.एकीकडं नेहमीप्रमाणे लग्नातील प्रत्येक क्षणाचे फोटो, आणि व्हिडिओ नवरदेव आणि नवरीकडच्या फोटोग्राफर्स टीम कडून काढणं सुरू होते. त्यात हॉल मध्ये एक व्यक्ती, नटून थटून आलेल्या मुलींचे फोटो काढत होता. अर्थात पूर्वीपपेक्षा आताच्या फोटोग्राफीची पद्धत खूप बदलली आहे.

फोटोग्राफीचे सुद्धा पॅकेज असतात, ज्यात नानाविध प्रकारचे व्हेरिऐशन्स असतात. मोबाईल रील, candid फोटोग्राफी. हे सगळं सहज Apple सारख्या चांगल्या मोबाइलवर होऊन जातं. त्यामुळं मुलींना वाटलं हा फोटोग्राफरच असावा म्हणून मुली देखील काढून घेत होत्या. तो फोटोग्राफरचा माणूस असेल असं सगळ्यांनाच वाटत होतं. त्यानेही तसंच भासवलं. मात्र लग्नात एक महिला होती. मुलाची ती नातेवाईक आणि अत्यंत तल्लख बुद्धीची. हे असं वर्णन मी थेट त्या महिलेचं का केलं? कारण तिच्या हजरजबाबीपणामुळे खूप मोठं संकट टळलं. समोर बसलेली ती महिला कटाक्षानं त्या माणसाचं निरीक्षण करत होती.

तिला शंका आली की हा त्यांच्या पैकी दिसत नाही. कारण तो फोटो काढत तर होता पण लगेच बघत होता, अशा बऱ्याच विचित्र गोष्टी त्या महिलेला त्याच्या बॉडी language मधून निदर्शनात आल्या. विशेष म्हणजे तो केवळ तरुण मुलींचेच फोटो काढत होता. हे तिच्या लक्षात आलं.तो माणूस अचानक वॉशरूमच्या दिशेने गेला. प्रसंगावधान राखून त्या महिलेनं आपल्या पतीला त्या माणसाच्या मागे नजर ठेवण्यास पाठवलं. तेव्हा तिथे त्यांच्या निदर्शनात आलं की हा हे फोटो कोणाला तरी पाठवत आहे. जे आवडले नाही ते तो तिथेच डिलिट करून टाकत होता. त्या महिलेच्या पतीने त्याची चौकशी केली तेव्हा तो बिथरला. उडवाउडवीचे उत्तरं देऊ लागला. त्यांनी लगेच त्याला खेचत हॉल मध्ये आणलं. अर्थात लग्नाचा हॉल म्हंटल्यावर तिथे चांगलीच गर्दी जमा झाली.त्या गर्दीत त्याला त्या महिलनं विचारलं. कोण तू? कोठून आलास? आणि मुलींचेच फोटो का काढत होता? तेव्हा त्याने मी कंपनीतून आलो असं सांगितलं. कदाचित नवऱ्या मुलाच्या कंपनीतला असू शकतो म्हणून त्याला विचारलं तर त्याने नकार दिला.मुलीनेही सांगितलं मी याला ओळखत नाही. फोटोग्राफर्सला विचारलं तर दोन्हीकडच्या फोटोग्राफर्सनी हा आमच्यातला नाही असं स्पष्ट सांगितलं. त्याने ज्या कंपनीचं कार्ड दिलं तिथे फोन केला तर “हा माणूस आमच्याकडे तीन वर्षांपूर्वी कामाला होता” असं त्यांनी सांगितल्यानंतर तो पुरता अडकला. त्या महिलेने त्याचा फोन हिसकावून घेत धाक दाखवत त्याचा पासवर्ड त्याच्याकडून घेतला, तर अनेक धक्कादायक खुलासे झाले. आधी गॅलरीमध्ये फोटोच नव्हते. त्याने लगेच डिलिट करून टाकले होते. मात्र महिलेनं recycle bin open केल्यानंतर तिला सगळे फोटो दिसले.
ते फोटो बघून सगळ्याच उपस्थितीतांचा संताप झाला आणि मुलीदेखील बिथरल्या. त्याला “तू या फोटोचं काय करतो?” ते सांग असं विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की तो असाच लग्नांमध्ये जातो आणि फोटो काढतो. त्याच्या कॅमेऱ्यात आदल्या दिवशीच्याही कोणत्यातरी लग्नात जाऊन काढलेले मुलींचे देखील फोटो होते. शिवाय अर्ध्या तासांपूर्वीच्या एका शेजारच्याच लग्नातील देखील फोटो होते. तिथे कोणीही त्याला हरकत घेतली नव्हती. महिलेनं त्याच्याकडून जेव्हा त्याचं व्हॉट्सऍप उघडून घेतलं तेव्हाचा प्रसंग अगदी थरकाप उडविणारा होता. त्याने हे फोटो एका ग्रुपला पाठवलेले होते आणि त्यातली

chat अशी : “इसमे से आपको कौनसी सेकंड marriage के लिए अच्छी लगती है? मेरे ख्याल से ये अच्छी है! ये इस इन्स्टिट्यूट में है!”

सगळेच अगदी सुन्न झाले. मुलींची एवढी इन्फॉर्मेशन याला कुठून मिळाली? हा लग्नात जावून ओळखू कसा येत नाही असे अनेक प्रश्न उभे राहिले. ज्यावेळी त्या महिलेनं त्या माणसाचं आधार कार्ड, पॅन कार्ड चेक केलं तेव्हा स्वतःला हिंदू म्हणवून घेणारा तो मुसलमान असल्याचं समोर आलं. लोकांचा राग अनावर झाला. त्याला थोडीफार मारहाण झाली. कायदा हातात घ्यायचा नव्हता म्हणून वेळीच सगळे सावध झाले. त्याने चक्कर येण्याचं नाटक केलं. तेवढ्यात पोलीस आले. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर त्यानं स्वतः सांगितलं की तो लव्ह जिहादी आहे! तो अशाच चांगल्या मुलींना घेरतो आणि फोटो पाठवतो. पुढे त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून किंवा वेगवेगळ्या पद्धती वापरून त्यांचं धर्मांतर करून लग्न केलं जातं. म्हणजे आपण किती सावध राहायला हवं आहे हे यातून लक्षात घ्या. हे असं सगळं आपल्या महाराष्ट्रात सुद्धा होतं हे जरा लक्षात घ्या. कारण होतं काय की, एकीकडे तो माणूस मुलींचे फोटो काढत असतो. त्यामुळं मुली "आपले फोटो मला पाठवा" म्हणून सर्रास त्या अनोळखी माणसाला नंबर देतात आणि पुढे चालून हाच माणूस त्यांना या फोटोरून blackmail करतो.

हे खरंच खूप मोठं षडयंत्र आहे. आज ज्यांच्या घरी लग्न होतं, त्यांनी प्रसंगावधान राखून वेळीच या गोष्टींकडे लक्ष दिलं. त्या महिलेनं, धाडसानं या सगळ्या गोष्टी समोर आणून त्या लव्ह जिहाद्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं म्हणून खूप मोठं संकट टळलं असलं, तरी हे लव्ह जिहादी सावट सगळीकडे दबा धरून बसलंय. असे 'अब्दुल' कुणाच्याही लग्नात येऊ शकतात. त्यामुळं लग्नाला जाताना, लग्नात आणि ज्यांच्या घरचं कार्य आहे त्यांनी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. फक्त लग्नच नाही तर सगळेच कार्यक्रम या सावटाखाली आहेत. त्यामुळं सतर्क रहा.

एकंदरीतच, हसत-खेळत साजरे होणारे लग्न हे आपल्या आयुष्यातला सुंदर क्षण असतो, पण आजच्या काळात त्या क्षणातही सावध राहणं तितकंच आवश्यक झालंय. या घटनेनं आपल्याला एकच धडा दिला आहे – डोळे उघडे ठेवा, विचारपूस करा आणि कुणावरही आंधळा विश्वास ठेऊ नका. पण एक प्रश्न पडलाच पाहिजे, तुमच्या लग्नातही असा कुणी अनोळखी माणूस घुसला, आणि तो फोटोग्राफर असल्याचा दावा करू लागला, तर तुम्ही ओळखू शकाल का?

तुमच्या घरातील महिलांची, मुलींची अशी माहिती कुणा अनोळखीच्या मोबाईलमध्ये जात असेल तर तुम्हाला ते समजेल का? किती वेळा आपण केवळ 'पॅकेजचा भाग असेल' म्हणून विचार न करता फोटोज काढून घेतो? हा निष्काळजीपणा उद्या कोणत्या संकटात बदलेल, हे सांगता येईल का? आज त्या एका धाडसी महिलेमुळे मोठं संकट टळलं. अशी सतर्कता प्रत्येक महिलेमध्ये हवी.

म्हणूनच उद्या तुमच्या किंवा आपल्या कुणाच्या घरात असं काही होऊ नये, यासाठी आपणच सजग राहायला हवं. हा प्रसंग आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतो – डोळे उघडे ठेवा, विचारपूस करा आणि कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. जागरूकता आणि सजगता हाच आपला सर्वोत्तम बचाव आहे.
तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेन्टमध्ये जरूर शेअर करा.

https://viewprachi.blogspot.com/2021/03/blog-post.html



                                                                                                                                       🖋 प्राची नाईक उंडणगावकर🖋

शुक्रवार, २६ जानेवारी, २०२४

पुनश्च प्रजासत्ताक


पुनश्च प्रजासत्ताक

लढने को तैय्यार हम

बाजी जीती अंग्रेजो से

छिनने को तैय्यार हम

लढने को तैय्यार हम

चाहे प्राण गए सरहद पर

चाए फंदा लगे गले पर

फिर ना मुकरेंगे हम

लढने को तैय्यार हम

आझादी का वास्ता लेकर

लढने को तैय्यार हम....

लढने को तैय्यार हम....


नखशिखांत स्वातंञ्याची ऊर्जा, रोमारोमांत प्रज्वलित करणारे हे बोल आहेत,आपल्या क्रांतिकारकांचे. हे बोल आहेत, १५०वर्षं ब्रिटिशांच्या साखळदंडात बंदिस्त राहूनही, स्वाभिमिनाच्या तलवारीने गोऱ्याचा थरकाप उडवणाऱ्या जहाल समाजसुधारकांचे! ब्रिटिशांनी १५० वर्षे भारताचं मीठ खाऊन, त्यांच्या इंग्रजी प्रांताला समृध्द केलं. माञ स्वतंत्र लोकशाही प्रजासत्ताक असणाऱ्या या देशाला, भारताचा क्रांतिकारी बाणा अंगीकारता आला नाही. अन् शेवटी घेतलीच त्यांनी माघार, कारण अंगलट आला होता त्यांना त्यांचाच अहंकार! हे सगळं घडलं फक्त भारताच्या क्रांतिकारी भुमिकेतून, त्यांच्यात आलेल्या स्वातंञ्याच्या आत्मभानातून! अन् खरंतर तो होता खरा लोकशाही प्रजासत्ताक भारत! ते होतं लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता स्थापन केलेले राज्य! म्हणजेच  लोकशाही! 


आज २६ जानेवारी २०२४! आजपासून तब्बल ७४ वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाची अंमलबजावणी झाली होती. तो दिवस होता, दिनांक २६ जानेवारी १९५० चा! खऱ्या अर्थाने, भारताच्या प्रजासत्ताकावर यादिवशी शिक्कामोर्तब झाला. म्हणूनच हा दिवस आपण 'भारतीय प्रजासत्ताक दिन' म्हणून मोठ्या अभिमानाने साजरा करतो‌. तत्पूर्वी  म्हणजेच १९४७ पूर्वी हा दिवस ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा होत होता. कारण २६ जानेवारीला १९३० म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या रविवारी संपूर्ण भारतात पहिल्यांदाच तिरंगा फडकावला गेला आणि पुर्ण स्वातंञ्याचा संकल्प त्यावेळी घेण्यात आला होता. ही दिनांक कायमच भारतीय स्वातंञ्याच्या इतिहासात आठवणीत रहावी म्हणून या दिवसाचे औचित्य साधून संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली होती. एवढा सगळा ७४ वर्षांचा ज्वलंत आणि कीर्तीवंत इतिहास घेऊन आज आपण  प्रजासत्ताकाच्या पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावर उभे आहोत.


याच पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावरुन देशाकडे नजर टाकली, तर आपल्या सद्यस्थितीला भारत दोन भागात विभाजित झालेला दिसतो. हे दोन भाग अनेकार्थाने म्हणता येतात. सध्याच्या भारताची एकूण लोकसंख्या ही १४० कोटीपार आहे. या १४० कोटी जनमानसाचा देश एकीकडे विकासाच्या, तंञज्ञानाच्या, आधुनिकतेच्या, अगदी ऐशोआरामाच्या सीमारेषा गाठतो आहे. अन् याच नाण्याची दूसरी बाजू मरणासन्न गरिबीचं जीणं जगतांना दिसून येतेय. एकीकडे सरकारी क्षेञात कित्येक  मंडळी रुजू होत आहे, तर दुसरीकडे एका वेळेच्या भाकरीसाठी सुशिक्षित बेरोजगार तरुण कामासाठी रस्ते तुडवत आहेत. मोठमोठ्या शहरांचे भाग प्रचंड पाण्याची नासडी करतांना दिसून येतात तर झोपडपट्टीवासीय, मध्यमवर्गीयांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते आहे. ग्रामीण भागाची दयनीय स्थिती तर मग कुठल्या शब्दात मांडावी. सद्यस्थितीला सरकारी जागा देखील कंञाटीपद्धतीने भरल्या जात आहेत. एमपीएससी युपीएससी सारख्या परीक्षा तर होतात, पण निकाल लागायला मुद्दाम दिरंगाई केली जाते. का? तर कंञाटीपद्धतीने भरती केली गेली, तर  संबंधित नोकरदाराला आधी पैसे भरावे लागतात. हे म्हणजे असंय, ‘आधी आम्हाला भत्ता द्या, मग नोकरी घ्या’. आताची परिस्थिती तर अशी आहे की, अगदी उच्चशिक्षित तरुणसुद्धा शिपाई पदासाठी अर्ज भरतात आणि फक्त सरकारी नोकरी हवी म्हणून लाखो रुपये भरतात. पण त्यांना हे ज्ञान नसतं की, याच पैशातून त्यांना मासिक प्राप्ती होते. यामुळे सध्याची शैक्षणिक स्थिती खूप अवघड होऊन बसली आहे. खरंतर व्यवसायात जे शिक्षण हवं, ते मुळात आताच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातून मिळत नाही. त्यामुळे नोकरी शोधतांना तरुणांची हेळसांड होते. शिक्षित मुलांमध्येही कौशल्याचा अभाव असल्यामुळे कंपनी त्यांना नोकरीस ठेवण्याआधी १० वेळेस विचार करते. यामुळे कुठेतरी व्यावसायाधिष्टित शिक्षणप्रणाली असायला हवी. याव्यतिरिक्त अजून एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना परत सरकार Retainer ship वर भरती करून घेतात. असे होत राहिले, तर मग नवीन तरुणांना कधी संधी मिळणार? नवीन नोकऱ्या कधी निर्माण होणार? म्हणूनच या संदर्भातही आपण लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून एकदा विचार  करायला हवा. कारण हे सामान्यांचे, म्हणजे आपलेच प्रश्न आहेत. याला कारण कोण? व्यवस्था, जनता, सरकार की अन्य कोण?  याला कारण आहे मानसिकता, या तिन्ही घटकांची मानसिकता. ज्यांनी ही लोकशाही व्यवस्था आखून दिली त्यांच्या विचारातला भारत नक्कीच हा नसावा.


लोकशाही, गणराज्य, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक राष्ट्र! अशी ही चतु: सुञी संकल्पना. माञ सद्यस्थितीला ना कुठली धर्मनिरपेक्षता देशात नांदतांना दिसते, ना कुठली लोकशाही! मुळात भारताच्या राजकारणाचा मुळ लोकशाही असणारा पाया आता जातीवादी लोकशाही हा झाला आहे. बघा लोकशाही अजूनही आहे! पण  तिचे स्वरूप जातीवादी झालेय. एका कार्यक्रमात माझ्या एका सरांनी खुप सुंदर गोष्ट सांगितली, ती होती भाषेच्या बाबतीत. ते म्हणतात, कुठलीही भाषा ही कुठल्या जातीची, धर्माची, कुणा एकाच्या मालकीची नसते तर ती सर्वांची असते. भाषेतले जुने शब्द हरवणं म्हणजे भाषा मृत होत जाणं. अन् भाषा मृत होणं ही किती वाईट गोष्ट आहे, हे फक्त त्यालाच समजू शकतं, ज्याला भाषेची जाण असते. हे उदाहरण अगदी तंतोतंत इथे लागू होते. लोकशाही  हे बीज ज्या क्रांतिकारकांनी अभिजात स्वातंञ्यासाठी पेरले, त्या क्रातिकारकांचं बीज आपण पार खोडून आपल्या मनमर्जीने कारभार चालवायला निघालोय. अन् असंच होत राहिलं तर एक दिवस लोकशाही सुद्धा आपल्याला मृतावस्थेत सापडेल आणि तो दिवस सगळ्यात वाईट दिवस असेल. भारताच्या प्रजासत्ताकाला घातक ठरणाऱ्या गोष्टी सध्या देशात घडतांना दिसून येत आहेत. लोकशाहीचा सर्वात मोठा पिंड म्हणजे या देशाची निवडणूक. येथून देशाच्या सगळ्या व्यवस्थेचं सूञ निश्चित होतं. अन् भारतात निवडणूका या लोकशाही पद्धतीने पार पडतात हे वेगळं सांगायची गरज नाही. परंतु हीच निवडणूक प्रक्रिया, या प्रक्रियेसाठी उभे असणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांपासून ते उमेदवारापर्यंत सगळ्या गोष्टी अगदी भेसळ झालेल्या आहेत. आताच्या प्रत्येक राजकीय व्यक्तींना सामाजिक भान नसून ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणूक लढवतात, राजकारण करतात. एक सामान्य कार्यकर्ता जेव्हा खुर्चीकडे जातो, तेव्हा त्याची कर्तव्य विसरून खुर्चीच्या मोहाच्या राजकारणातच तो आपली धन्यता मानतो. मात्र अजूनही सामान्य कार्यकर्ता माञ त्या नेत्यामागे घाम गाळत फिरत बसतो. अन् लोकशाहीचा आधारस्तंभ असणारी जनताच या नेत्यांकडून गुंडाळली जाते. मग या परिस्थितीला लोकशाही म्हणावं का? निवडुन येईपर्यंत जनतेला हात जोडणारे, नंतर जनतेला स्वत: चे पाय धूवायला लावण्यासही कमी करत नाही. ही आहे आजची सत्य परिस्थिती.  मुद्दा काय तर जनतेतून मोठा झालेला नेता आता जनतेचाच राहिलेला नाही तर तो फक्त स्वत: चाच  होऊन बसला आहे. याही परिस्थितीत काही नेटाने काम करणारे, समाजभान असणारे आहेत. पण त्यांचा आवाज जनतेला ऐकू जात नाही. कारण जनता फक्त भ्रष्टांचीच कात धरतांना दिसून येते.


२ महिन्यांच्या निवडणूक प्रचारात ५०० रुपयांची नोट घेऊन, ५ वर्षांची गुलामी आपण पत्करु शकतो; माञ ५ वर्षांचा आपल्या भवितव्याचा अभ्यास करुन निरपेक्ष पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडणं, लोकशाहीयुक्त देशाच्या तत्त्वात बसत नाही. किती हा विरोधाभास! पण कटू असलं तरी हे वास्तव चिञ आहे. सध्याच्या भारताचं. जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद, लिंगभेद, बेरोजगारी, दडपशाही या सगळ्या साखळदंडातून मुक्त झाली होती आपली भारतमाता; पण याच मुद्यांना घेऊन आज पुन्हा एकदा आपला देश संघर्ष करतो आहे. कारण याच मुद्यांना पाठीशी धरून आजरोजी मतदान होतांना दिसते. म्हणूनच आजचा हा प्रजासत्ताकाचा दिवस आणि त्याला लागून आलेली सुट्टी ही फक्त औपचारिकता म्हणून तिरंगा फडकावण्याची नाही, ५२ सेकंद सावधान मुद्रेत उभं राहून देशाचं राष्ट्रगीत नावाला म्हणण्यासाठी नाही, वा त्यानंतर भारतीय प्रजासत्ताक दिनाचा विजय असो! वंदे मातरम्! भारतमाता की जय! या घोषणा अगदी कंठ फाटे पर्यंत प्रसंगानुरूप देण्यासाठीही नाही तर तिरंगा, राष्ट्रगान, घोषणा, हे आपल्या स्वातंञ्याच्या लोकशाही चळवळीचे प्रतिकं आहेत. हा दिवस आपल्यातलं देशाप्रती, समाजाप्रती आत्मभान जागृत करण्यासाठी आहे. ही सुट्टी फिरण्यासाठी नाही तर लोकशाहीतल्या अधिकाराच्या जाणिवेसाठी आहे. अन् तिरंगा, राष्ट्रगान, घोषणा, पथसंचलन,ढोलवादन, बिटिंग द रिट्रिट सोहळा, लेझीम, चिञरथ,तो लाल किल्ला आपल्याला याच जाणिवांची आठवण करुन देत असतो.


म्हणूनच आपल्याला आजपासून विचार करण्याची गरज आहे. डोळसपणे लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून देशाच्या व्यवस्थेकडे बघणं गरजेचं आहे. वेळ कधीच जात नसते. आपल्यात बदलाच्या शक्यता निर्माण झाल्या की वेळ आपल्या पद्धतीने कार्य करायला लागते. म्हणूनच या प्रजासत्ताकदिनी मृतावस्थेच्या दिशेने मार्गस्थ होण्याआधी लोकशाहीला नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीनं पाऊलं टाका. नक्की पुन्हा नवक्रांती होऊन आपली भारतभुमी प्रजासत्ताकाच्या प्रकाशात उजळून निघेल. देशात रामाराज्याचं निर्माण झालंय. आता फक्त भक्तीतून मनात राम येऊ द्या. मग बघा रामाच्या राज्यात कसे पुनश्च प्रजासत्ताक राष्ट्र प्रस्थापित होते....

अन् तो दिवस नक्कीच दूर नसेल 

या आशेत......

भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!


🖋 प्राची नाईक उंडणगावकर🖋



 

रविवार, १२ फेब्रुवारी, २०२३

झपाट्याने वाढणारी गुन्हेगारी - बदलेली मानसिकता की यंत्रणेचे अपयश ?

झपाट्याने वाढणारी गुन्हेगारी - बदलेली मानसिकता की यंत्रणेचे अपयश ?

आपलं गाव, आपलं शहर, आपला जिल्हा आणि एकूणच देशाच्या ज्या भागात आपण वास्तव्यास असतो, त्या विभागाने एखाद्या गोष्टीत कामगिरी केली तर आपल्यासाठी ती नक्कीच छाती फुगावी इतकी अभिमानास्पद बाब असते. परंतु तीच कामगिरी जर गुन्ह्यात परावर्तीत झाली तर? नक्कीच, कुणालाही असं वाटणार नाहीच. परंतु त्या नं वाटणाऱ्या लोकांपैकीच अनेकांच्या विकृतीतून उत्सर्जित झालेलं सध्याचं गुन्हेगारी विश्व हे मन हेलावून सोडणारं आहे. हीच आपल्या मराठवाड्याची कामगिरी आहे हे वाचून सुन्नही व्हायला होतं. मनात प्रत्येक घटनेविषयी संशयकल्लोळ निर्माण होऊन त्याची जागा प्रश्नार्थक चिन्हांनी अगदी व्यापून टाकली आहे. कानावर येणाऱ्या घटनांचा खोलात शिरुन अभ्यास करायचं ठरवलं आणि त्यातून उमटलेलं वास्तव हे भीषण होतं. औरंगाबादसारख्या ऐतिहासिक शहरात आणि पर्यायाने मराठवाड्यात मागच्या काही वर्षात गुन्हेगारी प्रवृत्ती अगदी विकोपाला गेलेली बघायला मिळते. 

औरंगाबादच्या इतिहासात डोकावून बघितले तर अगदी औरंगाबाद या नावावरुनच वादांकित वातावरण निर्माण झालेले दिसते. याला आता राजकारण म्हणावं, अस्मिता म्हणावं, का? लोकांच्या जुळलेल्या भावना? कानावर येणाऱ्या घटनांचा खोलात शिरुन अभ्यास करायचं ठरवलं आणि त्यातून उमटलेलं वास्तव हे भीषण होतं. राज्याची पर्यटन आणि मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराची ओळख आता गुन्हेगारांची राजधानी बनत चाललीय. आशिया खंडात सर्वात झपाट्याने वाढलेले शहर म्हणून ख्याती मिळविलेल्या औरंगाबाद शहरात आता गुन्हेगारीचे  प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढतंय. याला यंत्रणेचे अपयश म्हणावे की, लोकांची बदललेली मानसिकता की, वाढलेले नशेखोरीचे प्रमाण? काहीच धागा दोरा लागत नाही. कारण सगळे दोर हे एकमेकांत अडकून गुन्हेगारीची पाच पाऊलं पुढं, अशी एक नवी श्रृंखलाच तयार झाली आहे. 

तरुण मुलामुलींमध्ये नशेचे प्रमाण इतके वाढीस लागले आहे की, नशेसाठी ते कुठल्या कुठल्या थरावर जाऊन पोहोचलेत. दारू, गांजा, सिगारेट यापलीकडे जाऊन ड्रग्जचा अतिवापर सुरू झालेला दिसून येतो. ऐकून धक्का बसेल पण अक्षरं खोडण्यात येणारे व्हाईटनर हेही नशेचं एक माध्यम बनलं आहे. यातुन गुन्हेगारी प्रवृत्ती बळावतेच. सद्यस्थितीला औरंगाबादमध्ये हे प्रमाण खुप वाढलं आहे. २०२२ ची वेगवेगळ्या गुन्ह्याची आकडेवारी बघितली तर ते वर्ष हे औरंगाबादसाठी चिंतेची बाब ठरलं. खून, खूनाचे प्रयत्न, सदोष मनुष्य वध, बलात्कार, दरोडा, जबरीचोरी, घरफोडी दिवसा तसेच राञी या सगळ्या अंतर्गत औरंगाबादमध्ये एकूण ५३९४ गुन्हे दाखल झाले. यापैकी ४२९६ उघडकीस आले. मागे एक ट्रेंड चांगलाच गाजला. तलवारीने केक कापण्याचा. परंतु आपल्या देशात बेकायदेशीरपणे कुठलीही शस्ञ बाळगणे कायद्याने गुन्हा आहे हे माहित असूनही वर्षभरात ६७ गुन्ह्यांची नोंद झाली. दारुबंदी असो, जुगाराच्या आहारी जाऊन आपलं कुटूंब पार देशोधडीला लावणं असो. हुंडाबळी, शेतकरी आत्महत्या या सगळ्यांची एक वेगळी आकडेवारी गुन्ह्यात अचानक झालेला परिणाम विशद करते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकलेल्या जनतेला बाहेर काढणं अवघड होऊन बसलं आहे. नेमकी कारणं जेव्हा समोर येतात तेव्हा ती किती सहज होती याचा मागोवा लागतो. पण तीच सहजता गुन्ह्यामध्ये परावर्तित व्हायला क्षणाचाही विलंब लागत नाही ही माञ सद्यस्थिती आहे. 

झपाट्याने वाढलेल्या शहरासोबतच माणसाला आपल्या बुध्दीमत्तेचीही कक्षा तितक्याच वेगाने वाढवण्याची 
 सुप्त इच्छा निर्माण झाली. यासारख्या अनेक कारणामुळे माणूस सतत धावत असून, त्याला काम आणि वाढलेल्या गरजांव्यतिरिक्त दुसरं काही नजरेस पडतच नाही. अगदी सुख दु:खाच्या गोष्टींनाही पैशात तोलण्याचा त्याचा अट्टाहास हा कलियुगाचा द्योतक ठरला. याच हव्यासातून टेबलाखालची मिठाई ज्याला प्रमाण भाषेत भ्रष्टाचार असे रुप प्राप्त झाले व गुन्हेगारी प्रवृत्तीची उत्पत्ती झाली. वर दर्शविलेले गुन्हेगारीचे प्रकार हे प्राथमिक आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण याअंतर्गत होणाऱ्या गुन्ह्यांच्या प्रकारांनी सद्यस्थितीला हिंसक वळण धारण केलेले आहे. मागची २ वर्ष कोरोनाच्या लाटेतून जातांना अचानक सोशल मीडियाचे भरमसाठ वापरकर्ते वाढले. ताळेबंदीमुळे आधीच मानसिकरित्या खच्चीकरण झाल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यानीच शक्यतोर मोबाईलवरच वेळ घालवला. हिंसक चिञपट, अश्लील चिञणं, चुकीचा आशय वाचणे, बघणे त्याचबरोबर पब्जीसारख्या गेमच्या जाळ्यात अडकून जीव गमावणं असो, याचे अनुकरण प्रत्यक्षात झाले. यातुन अनेक गुन्हे समोर आलेत. घरगुती हिंसाचारात सासू - सासऱ्याकडून होणारा छळ, नवऱ्याने संशयातून केलेला महिलेचा निघृण खून या सारख्या हिंसाचाऱ्यांनी क्रुरतेची पायरीच गाठलेली अनेक बातम्यांतून समजते. 
 
ऐकण्यास कुतूहल वाटेल पण २०२२ मध्ये पुरुष हत्याचाराचेही गुन्हे पोलीस ठाण्यात नोंदवले गेले. तसेच मंगळसूत्र चोरी ४४ , ४५ मोबाईल तर तब्बल ९२५ वाहने मागच्या वर्षभरात चोरीस गेले. काय म्हणावे या आकड्यांना. नुकतीच मागच्या डिसेंबर महिन्यात सिल्लोड तालुक्यातील पानवडोद येथे २० जणांच्या टोळीने मध्यरात्री ९ घरांना फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला. त्याचा शोध अद्यापही लागलेला नाही. चुकीने अथवा योजनेतून घडलेल्या भीषण कृत्याला गुन्हा असं म्हणतात. पण लहान वयात केलेल्या गुन्ह्याला काय समजावं? यासाठी प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे आहेत माञ बालगुन्हेगारांचे वाढते प्रमाण ही चिंताजनक बाब आहे. मानसशास्ञातील एका संदर्भानुसार व्यक्तीचे वय हे दोन प्रकारे मोजता येते. एक तर जन्मतारखेनुसार दुसरे मानसिकदृष्ट्या त्याच्या शारीरिक व मानसिक क्षमतेनुसार. यामुळे अनेकदा असे होते की, व्यक्ती लहान वयातच मोठ्यांसारखे वागायला लागतात. त्यांच्या मानसिकतेतील बदल हे तो गुन्हा सिध्द करतांना विचारात घेतले जातात. परंतु प्रश्न उरतोच की लहान मुलं हे बालगुन्हेगार का होतात? तर अभ्यासकांच्या मते, समाजशास्त्रीयदृष्ट्या त्या वयातील त्याची वाईट संगत, वागणूक, आईवडीलांचे न ऐकणे, अर्वाच्च भाषेचा वापर या गोष्टी मुलांना अपराधाकडे ओढावतात. एक वेगळा भाग विचारात घेतला तर अनुवांशिकता आणि जातीयताही गुन्हे घडण्याला तितकेच पुरक घटक आहेत. ते जे बघतात तेच पुढे जाऊन करतात. याचा अर्थ एका कुटूंबातील सर्वचजण गुन्हेगार बनतात असं नाही. आणि शेवटी मानसशास्त्र सांगते की, याचा वंशाची काही संबंध नसून मुले ज्या वातावरणात वाढतात त्या वातावरणातून गुन्हेगारी त्यात अंगीकारते. आपण ऐकतो, अगदी एखाद्या शिवीवरुनही वा आईने पैसे दिले नाही या कारणावरुनही खून, आत्महत्या होतात. यासाठी उपाय काय तर पालकांनी आपला कामाचा व्याप जरा कमी करुन नेमकं आपलं मुल मोबाईल वर काय बघतंय याचा तपास घ्यायला हवा. आपल्या मुलांशी मैञी निर्माण करुन त्यांच्याशी संवाद साधायला हवा. ही बालगुन्हेगारी कमी होण्याकरिता पालक आणि पाल्य यांच्यातील‌ सुसंवाद यापेक्षा मुख्य दुवा नाही.  

कृषिप्रधान देशातील कृषीप्रधान मराठवाडा असं एक समीकरणच आहे. माञ मराठवाडा आणि मुख्यत्वे औरंगाबाद जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या थांबता थांबेना. निसर्गलहरीपणाबरोबरच सरकारवरील नाराजीचा सूर, मालाला न मिळणारा हमीभाव आणि दूर्दैव म्हणजे मुलीच्या लग्नासाठीचा हुंडा या ञासाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. काही शेतकऱ्यांना तर बळजबरीने जीवन याञा संपवण्यास भाग पाडले हे ऐकून तर क्षणभर डोळ्यासमोर अंधारीच येते. अर्थात यामागे असणारे राजकारणी विचार हेही गुन्हेगारच ठरतात. सायबर गुन्हे असो वा बलात्कार कितीही जनजागृती केली तरी रोज कित्येक मुलींवर अतिप्रसंग हा ओढावतोच. बलात्कारात डेट रेफ सारखा प्रकार रुढ झाला, त्यामुळे मुली कुठेही सुरक्षित नाहीच हेच खरे. परंतु गुन्हे दाखल होतात. कित्येक वर्षे न्यायालयात रेंगाळतात व नंतर काही दिवसांच्या कोठडीवर तो नराधाम सर्रास दूसरा गुन्हा करण्यास पाञ ठरतो. म्हणजे पहिले पाढे ५५. एका छोट्या ६ महिन्याच्या चिमुकलीलाही सोडलं जात नाही हो. काय विकृती म्हणावी याला. बरं अत्याचार करणारेही आपल्या जवळचेच निघतात हे संशोधनातून सिध्द झाले. काय करावं? घरी बसावं? भितीपोटी स्वत: ला जखडून ठेवावं? खरंतर असंच होतं. कारण बलात्कार पीडितेलाच यात बदनाम व्हावं लागतं. उद्धवस्त होतं ते तिचं आयुष्य तो माञ पुढच्या शिकारीच्या शोधास चारचौघांत उच्चपदस्थही होतो. कारण काय तर‌ कायदा. कायद्यात जर बलात्काराची शिक्षा अत्यंत कठोर असेल तर नक्कीच कुठेतरी या छळवणूकीला आळा बसेल.  

खरंच गुन्हेगारी प्रवृत्तींने अख्खं मैदान काबीज‌ केलंय. वर्तमानपञातील बाकीचे बीट बघितले आणि तुलना केली तर सुमारे ५० टक्के जागा ही फक्त गुन्हेगारीने भरलेलीच बघायला मिळते. अगदी कोणतेही वर्तमानपत्र घ्या. याविषयी अभ्यास करण्याचे योजिले तेव्हा इतका खोल आति विचलित करणारा हा विषय असेल असं वाटलं‌ नव्हतं. श्रध्दा वालकर प्रकरण आणि औरंगाबादमध्ये केमेस्ट्री लॅबमध्ये प्रेमप्रकरणातील निराशेतून मुलाने स्वत:वर रॉकेल ओतून मुलीला मारलेल्या मिठीचे भीषण जळीतकांड, या घटनांमुळे मानवी प्रवृत्ती इतकी बीभत्स आणि क्रूर कशी असू शकते? अशा प्रतिक्रिया उमटल्या. हे धक्कादायक होतं कारण घरापासून दूर ठेवलेल्या पाल्यांची पालकांना अधिकच चिंता वाटायला लागली. याचा उलट परिणाम ग्रामीण भागातील मुलींवरही झाला आणि कित्येकींच्या शिक्षणाला टाळा लागला. हे असे दुष्परिणाम थांबवण्यासाठी शाळा महाविद्यालयीन स्तरावर नुसती जनजागृती होऊन‌ चालणार नाही तर ठोस उपाययोजनांची गरज आहे असं नक्कीच वााटायला लागलंय. संभाव्य गुन्हे टाळण्यासाठी उपाययोजना करतांना विद्यार्थीदशेत प्राथमिक स्तरावर त्यांना मानसशास्त्र हा विषय असणंही तितकच परिणामकारक ठरु शकतं. त्याचबरोबर कित्येकदा मानसोपचार तज्ञांकडे जाणारा व्यक्ती म्हणजे तो मनोरुग्णच असतो, असा अर्थ काढला जातो; माञ तसं नसून ती एकप्रकारची उपचार पध्दती आहे याचीही रुजवण जनमानसात व्हायला हवी. 

प्रशासन हे देशाचे पालकत्वच निभावत असते. माञ कधीतरी त्यांच्याकडून होणारे गुन्हेगारांचे पालनपोषण आणि सामान्य माणसांचे शोषण हे विरुद्ध समीकरण पीडित लोकांना हार मानायला भाग पाडते. त्यामुळे अशी डळमळीत यंञणा पोलिसांवरही दबाव टाकून गुन्हा दाबून टाकते. मग काय सामान्य माणूस हातपाय गाळून शांत बसतो.‌ याचं उत्तम उदाहरण म्हणजे २०२३ च्या सुरुवातीलाच एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या सहकाऱ्याच्या पत्नीची छेड काढली. म्हणजे थोडक्यात काय तर देशाचे रक्षकच जेव्हा भक्षच बनतात तेव्हा कोणाला दोष द्यावा हा पर्यायही मरुन जातो. एकूणच काय तर माझ्या आकलनानुसार २०२२ हे वर्ष गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसवण्याचं नाही तर गुन्हेगारी प्रवृत्तीस हवा देण्याचंच काय ते शस्ञ ठरलंय. २०२२ च्या या अहवालाची समीक्षा समजून निदान २०२३ मध्ये तरी सरकार, सामान्य माणूस, प्रशासन खडाडून जागी होईल आणि हे वर्ष गुन्हेगारांनाही पश्चातापाची आस दाखवेल अशी आशा करुयात.....

                          🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

रविवार, १ मे, २०२२

वाटला विचारावा प्रश्न माझ्या महाराष्ट्राला...???





२१ व्या शतकातही विखुरलेला, तरीही  लोकबुध्दीतून उत्पत्ती झालेल्या जातीयवाद, दंगली, वर्णभेद, धर्मभेद, वंशभेद, कुटीर राजकारण, स्वार्थी वृत्ती अशा असंख्य पारतंञ्याच्या बेडीत सद्यस्थितीला बंदिस्त झालेला माझा महाराष्ट्र खरच आता होरपळतांना दिसतोय मनुष्यातील सत्ता, श्रामंती, लालसेच्या‌ अतिशयोक्तीपुर्ण हव्यासात! अखंड परिश्रमांच्या पराकाष्टेतून मराठीच्या करुण मातीत महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. सबंन्द देशात नसावे  असे  महान राष्ट्र , परिपूर्ण असे राज्य जे आपल्यातच एक महाराष्ट्र म्हणून देशाच्या नकाशावर शानेने तोल सांभाळत उभं आहे..
तोच  माझा महाराष्ट्र बलदंड असा इतिहास कदाचित‌ पुसट करतोय...
विसरतोय त्या मातीसाठी जीवाचे रान केलेल्या महाराष्ट्र प्रेमींना आणि चालला फक्त पुढे घड्याळाच्या आणि स्वार्थी वृत्तीच्या मार्गावर....
पण; कितीही केलं तरी शेवटी राज्यच ते! कधीतरी उठेलच की पेटून पण वेळ तर नसेल न‌ गेलेली तेव्हा आपल्या दवडून?
म्हणूनच .......
वाटला विचारावा प्रश्न माझ्या महाराष्ट्राला??


मराठीच्या मातीत जन्मलेल्या माझ्या महाराष्ट्रा...
कसा रे अडकलास जातीयवादाच्या चक्रव्युवहात‌ तू?

सतांच्या शिकवणीतून घडलेल्या माझ्या महाराष्ट्रा...
कसा‌ रे‌ लोटला गेलास भ्रष्टाचाराच्या घाणीत तू?

 छञपतींचा इतिहास जागता ठेवणाऱ्या माझ्या महाराष्ट्रा...
 कसा रे केलास स्वत:चा औरंगजेब तू?

ग्रामीण संस्कृतीचे जाते दळणाऱ्या माझ्या महाराष्ट्रा
कशी पाडलीस दरी गाव शहरातील संस्कृतील तू?

व्हावे राष्ट्र महाराष्ट्र म्हणून युक्तीतून शक्तीत लढणाऱ्या माझ्या महाराष्ट्रा....
का पाडलाच कलश त्या एकात्मतेचा तू?

छञपतींसहित ,फुले शाहू , आंबेडकर ,टिळकांच्या जडणघडणीतून साकार झालेल्या माझ्या महाराष्ट्राला...
कसा रे शिक्षणात लाजिरवाणा झालास तु?
कसा रे बलात्कारात अव्वल ठरलास तू?

गर्व अभिमान असणाऱ्या माझ्या प्रिय महाराष्ट्रा कुठे हरवला तुझ्यातील देशभक्तीचे सप्तसुर
असा नव्हता माझा महाराष्ट्र..
कधीच नव्हते ईथे कुणीच भ्रष्ट....

संत ,महंत,समाजसुधारक..
घडले इथेचसाहित्यातील नोबेल धारक...
अशीच माझ्या महाराष्ट्राची देशभरातील पारख...
 
समुद्राच्या खोलापरी जागत्या इतिहासाची साक्ष घेणाऱ्या माझ्या महाराष्ट्रा...
खडबडून जागा हो , वात अजून‌ तेवतेय...
दे स्वरुप तिला मशालीचे अन् लाव आग त्या तुझ्याच बहुरुपी रुप घेतलेल्या महाराष्ट्राला न मुक्त हो तुझ्याच   नवनिर्मितीसाठी...
जग त्या मराठी जननी साठी....

वाहून ने वारे तडीपार नकारात्मकतेचे
 येवू वादळ जातीमुक्त , भ्रष्टाचारमुक्त सकारात्मकतेचे
यूवू दे वादळ तुझ्यात निर्माण झालेल्या इतिहासातील‌ त्या लढवय्या, शुरस्त क्षणांचे
जागे कर तन‌मन धन या समस्त महाराष्ट्र प्रेमींचे..

शेवटी.....
अखंड माझ्या महाराष्ट्र देशा....
खुंटलेल्या प्रगतीला नितळ यशाचा दोर‌बांध...
घडलेल्या घटनांचा वेळीच चारा बांध...
समानतेचे व्रत रुजव ते महाराष्ट्र प्रेमींच्या आरपार...
स्ञी सक्षमतेला स्विकार करण्याची त्याच्या मनाला दे एक धार...
धुळीतल्या राजकारण्यांना धुळ चार...
 स्वयंप्रकाशातील प्रेरणेच्या रस्त्यावर कर अखंड वाटचाल...
 कर अखंड वाटचाल....
प्रिय आमुच्या महाराष्ट्रा, तुच आहे‌स देशोन्नतीच्या कार्याचा एक प्रखर ललकार....
एक प्रखर ललकार...!
                       ‌     🖋️प्राची नाईक उंडगावकर🖋️

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

🪞🖋️"दर्पणदिन विशेष"🖋️🪞

दर्पणदिन
darpandinvidhesh        
                 🖋️🖋️द‌र्पणदिन विशेष 🖋️🖋️   ‌‌                
 आज पासून सुमारे १९० वर्षांपुर्वी एका महान पुरुषाने मराठी अस्मितेला देशाच्या चौथ्या स्तंभाची ओळख करुन दिली. हा दिवस होता ६ जानेवारी १८३२. मराठीतील पहिले वृत्तपत्र 'दर्पण' हे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या लेखणीतून साकारले. समाजात जेव्हा ते वावरायचे तेव्हा अनेक समस्यांना तोंड देणारा वर्ग, अनिष्ट चालिरितींच्या गाळात फसणारे निरक्षर लोक आणि बहुतेक गोष्टींमुळे समाजात पसरलेली अस्थिरता आचार्यांना बघवत नव्हती. याच सर्व गोष्टींविरोधात कोणत्यातरी माध्यमातून वाचा फोडता यावी आणि विचारांच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण व्हावी या संकल्पनेतून त्यांनी दर्पणला जन्म दिला.

 सुरुवातीला जरी जनमाणसाला या नव्या माध्यमाची ओळख जरा रुचायला वेळ लागला तरी हळुहळू यातून सकारात्मक बदल दिसायला लागला. या एका वृत्तपत्रातून भाषेची, लेखणीची ताकद काय असते, हे त्या काळापासून ते आता पर्यंत आपण अनुभवतो आहोत. खरंतर नुसतं अनुभवण्यापेक्षा प्रत्यक्षात आपण ते जगत आहोत. तेव्हा झालेला पञकारिता विश्वाचा जन्म आज कोणत्या प्रवाहाकडे वाटचाल करतोय हे बघताना माञ अनेक पैलू उलगडतात. ज्या मुल्यांच्या पायाने पञकारिता रचली गेली ती पञकारिता खरच आज जिवंत आहे का? आज पञकारिता कोठे आहेतॽ पञकारांना खरच अभिव्यक्त होता येतं काॽ असे अनेक प्रश्न सध्या पञकारांच्याच डोक्याला भुंगा लावताय. जे नव्याने या क्षेत्रात येवू पाहता आहेत, त्यांच्यासाठी पुढे पञकारिता क्षेत्र कसे असेलॽ हाही एक मुद्दा आजच्या मराठी पञकार दिनाच्या दिवशी विचार करण्याजोगा आहे. 

१९० वर्षात पञकारितेचे स्वरुप कोड्याच्या ठोकळ्यासारखे बदलत गेले. प्रत्येक वर्षी एक नवीन रंग त्यात येतोय आणि हे कोडं न उलगडणारं आहे. आता बघा ना, सुरुवातीला काळ्या पाढंऱ्या रंगातील वृत्तपञाची रंगीत वृत्तपञाने जागा घेतली आणि याच वृत्तपञातील बातम्या दृकश्राव्य माध्यमातून पुढे आल्या.  आता तर सोशल मिडियाच्या दुनियेत तर दर सेकंदाची अपडेट आपल्या एका क्लिकवर बघायला मिळतेय‌. कुस बदलावी तसा पञकारितेचा विकास होत गेला. छपाई माध्यमांचे अस्तित्व टिकेल का?  हा प्रश्न या झपाट्याने होणाऱ्या विकासावरुन पडला तरी दर्पणाची सुरुवात ही छपाई माध्यमातूनच झाली. सगळ्या माध्यमांचा पाया म्हणजे छपाई माध्यम! जरी स्रोते वाचण्यापेक्षा बघण्यावर, ऐकण्यावर भर‌ देत असले तरी अजूनही वर्तमानपत्र वाचल्याशिवाय अनेकांची सकाळ  प्रसन्न होत नाही. पञकार घडतो तो छपाई माध्यमातूनच. त्याची लेखणी तिथेच तळपते. पञकारितेचे  स्वरुप जरी  दिवसेंदिवस बदलत गेले तरी छपाई माध्यमातील पञकारिता सदैव जिवंत राहिल यात काही दुमत नाही.

पञकार म्हटलं की कुणाच्याही तोंडातून बाहेर पडणारे दोन शब्द म्हणजे 'समाजाचा आरसा'! आरसा हा खरा चेहरा समोर आणतो. आपण जगाशी बेसुमार खोटं बोलू शकतो पण आरश्यात बघितलं की स्वतःशी‌ माञ खोटं‌ बोलल्याची लाज वाटतेच ना!  तेव्हा माञ आपल्याच नजरेला नजर भिडत नाही; परंतू पञकाराला समाजाचा आरसा म्हणून संबोधन माझ्या विचारसरणीला न पटणारं आहे. कारण आरसा हा जरी प्रतिबिंब दाखवत असला तरी तो ते उलटं प्रतिबिंब दाखवितो. उजवी बाजु डावी तर डावी बाजु ही उजवी तसेच ३ चे ६ ही किमया आरसाच करतो. असा काहीसा तो आरश्याचा खेळ. पञकार हा पारदर्शी असावा, पञकाराची लेखणी तलवारीप्रमाणे धारदार असली तर त्या लेखणीच्या तीक्ष्णतेतून बदलाचा सुर्य दिसतो. पञकारितेचं शिक्षण घेवून ऑफिसमध्ये बसून राहून काम करणं म्हणजे पञकारिता नव्हे तर त्यासाठी आधी हाडाचा पञकार व्हावं लागतं. अंगी फक्त पञकारिता ह्याच रक्ताची साठवण करावी लागते. जेव्हा पञकाराच्या दृष्टीला समाजाची दृष्टी लाभेल, त्याला दु:ख, वेदना, हालपेष्टांची जाणीव‌ होऊन तो  अखंडीत त्या कार्याला वाहून देईल तेव्हा खऱ्या अर्थाने हाडाचे पञकार निर्माण होतील. एका पञकाराला परिपुर्ण होण्यासाठी अनेक प्रसंगांतून जावं लागतं. नव्याने स्वतः चा शोध घेत निर्भीडपणे समाजासाठी उभं रहायचं असतं. या प्रवासात अनेक दिव्य त्याला भेटतात आणि  आजच्या युगात त्या दिव्यातून जे पञकार जातात, त्यांना माञ त्यांची अभिव्यक्ती गमवावी लागते किंवा त्यावर मर्यादा येवून ती थांबवली जाते. जरी या गोष्टीवर  मुक्तपणे बोललं जात नसलं आणि बोलूनही परत त्या दिव्यांना तोंड देण्यामध्ये काही अर्थ दिसत नसला तरी आजच्या पञकारितेतील‌ हे वास्तव चिञ आज‌ स्पष्टपणे दिसतंय; पण त्याला धुसर करत पञकारितेचा गाडा पुढं चाललाय आणि याच विषयाच्या अवतीभवती वर उपस्थित केलेले सर्व प्रश्न आहेत. 

अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी जांभेकरांनी वृत्तपत्र छापले. देश बदलण्यासाठी टिळक, आगरकर, अनंत भालेराव यांनी जांभेकरांनी दिलेली लेखणी हाती घेत उत्तम पञकारिता करत आपल्या रोखठोक शैलीतून लोकांना दिशा दिली. निरपेक्ष आणि समाजभान राखणाऱ्या पञकारितेतूनच आज आपल्याला एक अमूलाग्र बदल दिसतोय; पण तोच पञकारिता क्षेञाचा वारसा पुढे नेतांना माञ पञकारांचा आवाज माञ दबतोय. इच्छा नसूनही त्यांना चुकीच्या गोष्टींसाठी दुसऱ्यांचे विचार मांडावे लागताात असं वाटतंय. आजची पञकारिता कोठे आहे? तर‌ खरंच पञकारासारखा विचारी माणूसही विकला जातोय हे एकणंही किती मनाला चटका लावून जातं. जो पञकार हा समाजाचा आवाज असायला हवा तो बड्या लोकांकडून मॅनेज होतांना दिसतो. यामुळे खऱ्या पञकारांचा माञ जीव‌ जातो. पञकार हा नुसताच त्याच्या प्रोफेशनपुर्ता पञकार‌ नसतो‌ तर तो मनाने आणि जीवाने पञकारिता जगत असतो. काही अपवाद असतात जे या निष्पक्ष पञकारितेचा अवमान‌ करत पैशासारख्या विषाला बळी पडतात. म्हणून आजच्या काळात पञकारितेचे स्वरुप जरी सोपे झाले असले, ते आपल्या मोबाईल वर आले असले तरी खऱ्या पञकारांसाठी माञ खुप आव्हानं आहेत. पण हाडाचा पञकार त्या आव्हानांचा सामना करत आपली परिसीमा गाठतोच आणि हे बळही पञकारिताच देते. अनेक वर्षांपुर्वी वृत्तपञांपुरतीच मर्यादित असलेल्या पञकारितेने आज अनेक माध्यमे काबीज केली आहेत. रोज नवनवीन पञकारितेचे दरवाजे खुले होत आहेत आणि ह्या प्रवाहाचा समुद्र होतोय. समुद्र व्हावा तो अगदी अथांग व्हावा माञ पञकाराला आणि त्याच्या पञकारितेलाच लुप्त करेल एवढाही तो‌ अथांग नसावा असं प्रांजळपणे‌ वाटतं. 

आज अनेक बड्या मराठी पंञकारांनी आपल्या शैलीतून पञकिरितेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे; पण तरीही ती कुठेतरी एकाच बाजुने‌ मागच्या काही काळापासून झुकलेली दिसते आहे. याला कारण म्हणजे पञकारितेतील राजकीय हस्तक्षेप. आपण चुकीचं केलं तरी जनतेपर्यंत माञ आम्ही किती चांगलं काम करतो हेच दाखवण्यात यावे असा त्या हस्तींचा आग्रह असतो. ज्या व्यक्तीमुळे वृत्तपञ किंवा डिजिटल माध्यमांना, दुरचिञवाहिन्यांना चांगल्या प्रतिच्या जाहिराती मिळत असतील त्यांच्या विरुद्ध बातम्या न छापणे किंवा लावणे ही एक पहिली माध्यमांची अटच झाली आहे. जर‌ या अटींविरुध्द जाऊन पञकाराने एक चांगले काम केले तर आजकाल त्याला पाकिट हातात देऊन घरचा रस्ता दाखविला जातो अशी परिस्थिती आहे.
 
जशी पञकारांना काही बाबतीत अभिव्यक्ती नाही मिळत याउलट अनेक पञकार किंवा काही लोक पञकारितेचा गैरवापर करतांना दिसतात. पञकारितेच्या नावाखाली सामान्य जनतेकडून पैसै उकळतात. उगाच पञकारितेचं‌ वजन दाखवत चांगले काम बंद करतात. यामुळे पञकारिता या क्षेञाचा निरादर तर होतोच; पण  पञकारांबद्दलचा विश्वासही हलतो. पञकार हा जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी लढणारा एक योध्दा आहे; जनतेवर राज्य गाजवणारा हुकूमशहा नाही. अशा उगाच पञकारितेच्या नावाखाली जनतेला, सरकारला ञास देणाऱ्या खोट्या पञकारांना आवर घालणे‌ गरजेचे आहे. मराठी पञकारितेची अस्मिता जपुन ठेवणे हे पञकारांचे कर्तव्य आहे. तेव्हाच ते कर्तृत्व गाजवू शकतात.

मागच्या दोन वर्षांत कोरोना नावाच्या विषाणूने सर्वच क्षेञावर कब्जा केला. त्यातून पञकारही सुटले नाही; पण ते थांबले नाही. कोरोनासारख्या राक्षसाचा वार‌ निधड्या छातीने अंगावर घेत अत्यावश्यक सेवा देत त्यांनी लोकांपर्यंत बातम्या पोहोचवल्या. ताळेबंदीत सामान्य जनतेला मदतीचा हात दिला. ताळेबंदी असतानाही रस्त्यावरचे हाल लोकांना दाखविले, औषधांबाबतीतला काळा धंदाही समोर आणला आणि योग्य औषधं लोकांपर्यंत पोहोचवलीसुध्दा‌. यात अनेक पञकार बांधवांना कोरोनाने गिळंकृत केले. अशा कठीण प्रसंगातून सावरत परत एकदा सगळच उभं रहात होतं; पण जशी डोळ्याची पापणी लवते न लवते ओमीक्रॉन नावाच्या विषाणूचा प्रसार सुरु झाला आणि २०२२ चा उगवता सुर्यच ओमीक्रॉनचा शिकार झाला. राज्यसरकार ने परत निर्बंध आणत ज्ञानदानाचे विद्यापीठच ताळेबंद केलं. यावरुन सगळया विद्यार्थ्यांच्या मनात एकाच प्रश्नाने घर केलेे. कोरोना शाळा, महाविद्यालयातच जाऊन होतो का? भाजी मंडी, वर्दळीच्या जागांना तो घाबरतो का? आणि हे प्रश्न रास्त आहेत. याने‌ शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांची मनं पार कोलमडून जात आहेत ओ! त्यांना त्यांचं भविष्य अंधाारात दिसतंय. या विषयाचा इथे काय संबंध? असा प्रश्न पडलाच असणार. तर आज पञकारिता दिनाच्या दिवशीच महाराष्ट्रात पञकारिता विभाग भावी पञकार विद्यार्थ्यांविना ओस पडलेले बघायला मिळाले. ज्या अभ्यासक्रमातून देशाचा चौथा स्तंभ घडतो, ज्या अभ्यासक्रमात जास्त महत्त्व हे संशोधनयुक्त अभ्यासपध्दतीला आहे, तोच पञकार विद्यार्थी आज कोरोनामुळे घरी बसतोय. मग त्यांना पदवी मिळाल्यानंतर पुढं काय? कसा असेल त्यांचा हा प्रवास. प्रत्येक पञकार‌‌ प्रत्यक्ष कृतीतून घडत असतो. त्याच्यातील गुणांची पारख करत महाविद्यालयच त्याला योग्य दिशा देतं मग ही महाविद्यालयं जर‌ बंद झाली तर मग पुढे याचं भविष्य काय? जर‌ दहावी बारावीचे वर्ग चालू असू शकतात तर पदव्युत्तर शिक्षणाला काहीच महत्व नाही का?  या निर्णयातून तर‌ हेच दिसतय. शोधला की पर्याय हा सापडतोच; पण या सगळ्यात विद्यार्थ्यांना माञ चुकीच्या निर्णयांना बळी पडावं‌ लागतयं. आज पञकारितेत येवू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त एकलव्य होवून शिक्षण घेत आपण देशासाठीचं देणं लागतो, हे सिद्ध करावं लागणार. 

हे क्षेञ खरच खुप जादुमय आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सर्वार्थाने विकास होतो आणि मगच तो पञकारितेसाठी सक्षम होतो. यात सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे पञकार सदैव एक विद्यार्थी असतो जो सर्व क्षेञातील ज्ञानामृत पीऊ शकतो. जो थांबला त्याला पञकारितेत पुढे जाणं‌ उमजत नाही. मराठी पञकार‌ दिनाच्या या १९० व्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व पञकार हे देशाच्या चांगल्या भवितव्यासाठी, मराठी पञकारिता अजून बळकट होण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांचे पाईक आहेत. ही शपथ मनात रुजणे महत्वपूर्ण आहे. म्हणजे परत एकदा तरल पञकारितेतून जनविकास साधता येईल!

देशाचा चौथा आधारस्तंभ मजबूत होईल हीच आशा...
पञकारांच्या प्रत्येक स्वप्नाला प्राप्त होवो सदैव एक नवी दिशा...
ऊन, पाऊस, वादळ, वारा...
 सोसून उभा राहू दे पञकार न्यारा..
 नवा आयाम पञकाराचा व्यापू दे विश्व सारा..
 नव्या विचारांची नवी धारा..
 निष्पक्ष पञकारिता हाचा असो पञकारांचा नारा....!

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन आणि सर्व पञकार बंधू-बघिनींना पञकारदिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा.....!      

                           🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

 
                        

मंगळवार, ९ मार्च, २०२१

माझा भारत,माझी सुरक्षा



माझा भारत,माझी सुरक्षा
प्रश्न पडलाय मला ,माझा भारत माझी सुरक्षा - देशाची सुरक्षा का देशातल्या मुलींची? 
हल्लीच्या दिवसातील महत्वाचा मुद्दा म्हणजे स्ञी-सुरक्षा. ज्या भारतभुमीने माझ्यासारख्या मुलींना, महिलांना समानतेचा हक्क मिळवुन दिला, साविञीबाईच्या अथक प्रयत्नातुन दर्जेदार शिक्षणाचीही हक्क मिळवुन दिला, स्ञीयांना सन्मानाची वागणुक दिली, अहो एवढेच नाही तर भारतातील महत्वाची कार्यप्रणाली म्हणजेच निवडणुक प्रक्रिया तिथेही प्रयत्नांची पराकाष्टा करत, सर्वप्रथम भारतीय स्ञी वर्गाला मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार दिला, त्याच आपल्या महान राष्ट्रात स्ञियांमध्ये असुरक्षिततेची भावना का बरं निर्माण व्हावी?

निर्भया सारख्या कित्येक मुली रोज या अशा विचिञ घटनांना बळी पडता आहेत. त्याची तर गणतीच होवु शकत नाही. रोज वर्तमान पञात अशा घटना वाचताना मन अगदी हेलावुन जाते व मनात प्रश्नांचे काहूर उठू लागतात. आज ही मुलगी आहे, हिच्या जागी उद्या मी तर नसेल?मी उद्या एकटीच बाहेर पडले व माझ्या मागे कुणी आलं तर? असा पेचप्रसंग माझ्यावर ओढावला तर? माझं काय होईल? लोक माझी साथ देतील?  माझ्यावर झालेला अन्याय समजुन घेतील? का मलाच या सर्वात दोष देवुन मोकळे होतील? असे अनेकानेक प्रश्न माझ्या मनात आपोआप निर्माण होतात व आपोआप सकारात्मक विचारांची जागा नकारात्मक विचार घेतात व अशा घटना एकुण एक क्षण जसं मन चीडीने, रागाने, द्वेषाने पेटुन उठतं तसंच त्याच घटनेनं भयभीतही होतं. 125 कोटी जनसमुदायाचा हा देश जिथे माय, बहीण, लेकी, सुना सुरक्षित नाही, त्या देशाच्या सिमासुरक्षा मग कितीही दणकट करा काही फायदा नाही. ज्या देशात आपलेच लोक अतिरेक्यांसारखे मुलींवरती वाईट नजरा टाकतात व त्यांचा फायदा उचलतात तो देश दुसऱ्या देशातील अतिरेक्यांना मारतोय व सिमासुरक्षा चोखपणे बजावतोय. अरे निदान ते अतिरेकी तरी समोर येवुन युध्द करतात. एक तर मारतात किंवा मारले जातात पण या आतल्याचं काय करावं, ते गुन्हे तर करतात पण निर्लज्यासारखे काहीही न करता छातीठोकपणे फिरतात. ज्या नराधामांवर खरी कारवाई व्हायला हवी त्यांच्यासाठी दुर्देवाने आपले देशात त़्यांना जोम बसेल असा कायदा नाही. अरे जेव्हा निर्भयासारख्या निष्पाप मुलीचा या अत्याचारातुन बळी गेला तेव्हाच जर कडक पावले उचलली असती तर असले घाणेरडे खुळ थोड्या प्रमाणात का होईना कमी झालेच असते, पण कायदा माञ परवानगी देत नाही. आपण फक्त तारखांची वाट बघावी.  निर्भयाच्या मारेकाऱ्यांच्या निकालाला विलंब झाला, त्यांना जेव्हा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली खरच  तेव्हा प्रत्येक मुलीला आश्चर्याचाच धक्का बसला असावा नाही का!  त्या मुलीचा जीव गेलाय तरीही कायद्याच़्याबाजुनेच चाला ,मग तो योग्य असो वा नसो.


बरं असे गुन्हे का घडतात? यावर कधी विचार केलाय? नकळतपणे मुली अशा घटनांना का बळी पडतात?  याबाबतीत तर आपल्या जनमानसात जनजागृतीच नाही. खुप वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या या गोष्टी घडण्यास प्रोत्साहन देतात; त्यात प्रामुख्याने व्यसनाधिनता, वाईट सवयींच्या आहारी जावुन या गोष्टी घडतात. मोठमोठ्या  शहरात पब, पार्ट्या, सट्टेबाजी अशा अनेक माध्यमातनं ह्या गोष्टी सर्रास चालु असतात. तिथेच मोठ्याप्रमाणात या गोष्टी घडतात. यातील मी मिळविलेल्या माहितीनुसार इथे चालणारा  एक सगळ्यात महत्वाचा वाईट प्रकार म्हणजे date rafe. मुलींना डेट वर घेवुन जायचं, तिथे एक विशिष्ट द्रव्य असते ते जर एक थेंब जरी मुलीच्या पेयामध्ये मिसळलं तर  त्या मुलीची स्मरणशक्ती, मेंदुच्या विचार करण्याच्या नसा अशा प्रकारे block होवून जातात की तिची तिलाच शुद्ध नसते व सकाळपर्यत त्या मुलीचं आयुष्य बरबाद झालेलं असतं. किती वाईट ना! अशाच द्रव्यांचा चुकीच्या पध्दतीने का होईना आपल्या देशात पुरवठा सुरूच आहे. असही काही असतं हे ऐकुणच मन सुन्न व्हायला लागतं. मग एवढ्या संधी असुनही या असल्या घाणेरड्या नजरांमुळे प्रसंगी पालकही मुलींना मागे खेचतात. काही मुली काहीतरी करून दाखवण्याच्या ईच्छाशक्तीने मोठ्या हिमतीने बाहेर पडतात पण अशा घटनांना सामोरे जाण्याच्या भीतीने परत त्यांचे पाय आपोआप मागे ओढले जातात.
 
खरच या बाबतीत अतिशय सखोल विचार करण्याची व कठोर पावले उचलण्याची नितांत गरज आहे. स्ञी ची इज्जत, तिची अब्रु, तिचा स्वाभिमान, तिची जिद्द आणि तिची धडपड हे सर्व अग्रगण्य असायला हवं. कारण आज ती उभी आहे म्हणुनच हे जग उभे आहे. निर्मिती आणि उन्नतीची संरचना म्हणजेच 'स्ञीशक्ती'! तिच्या एवढी ताकद या समस्त मानवजातीत कुणाकडेच नाही. परंतु आपली संस्कृती माञ 'चुल आणि मुल' या संकल्पनेतुन तिला दुय्यम स्थानी खेचते. खरं तर इथे सखोल मनन केले तर संस्कृतीलाही दोष देता येणार नाही. तिने काही अटी शर्ती लागु केल्यात ना त्या, त्या काळातील परिस्थितीनुसार तेव्हाही स्ञी- पुरूषांना समान हक्क होते पण; त्याच संस्कृतीचा चुकीच्या पध्दतीने अर्थ काढुन स्ञियांवरील अत्याचार वाढता आहेत. संस्कृतीचा आधार घ्या पण तो समजुन घ्या, त़्यातील अशा गोष्टींचा स्वीकार करायला हवा , ज्या गोष्टी योग्य दिशा देतात. 

याच काही अनिष्ट चालिरितींमुळे अजुनही मागासलेला काही समाज कौटुंबिक कलहात बुडुन चाललाय. तिथुनच खरी स्ञियांमध्ये  असुरक्षिततेची भावना निर्माण होते.  
परिस्थिती बदलायची असेल तर आपला पायाच आपल्याला भक्कम करावा लागेल. ज्या दिवशी मी, आणि माझ्या देशातील स्ञी ताठ मानेनं बलात्कारमुक्त, गुन्हेगारीमुक्त अशा भारत देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात बिनधास्त वावरू शकेल ना तेव्हाच मी म्हणेल.....
हाच माझा भारत देश! ज़्यात मी सुरक्षित आहे
हाच माझा  भारत देश! जिथे स्वच्छंदी मनाने स्वप्नांच्या दिशेने भुरक् न भरारी मी घेवु शकेल
हाच माझा भारत  देश! ज्याने स्ञियांची सुरक्षा अग्रस्थानी मानुन अत्याचारांनासारख्या गलिच्छ गोष्टींना आळा बसवला.
आवडेल मला आणि माझ्या सर्व स्ञीजातीला माझ्या देशातील या किर्तीचे जगभर कौतुक करायला. पण ही वेळ येणार केव्हा? स्ञी सुरक्षा कायदे उपाययोजना फक्त कागवरच राहणार का येणार कधीतरी त्या संसद भवनाच्या, न्यायालयाच्या बाहेर? आज आपला भारतदेश सर्वच क्षेञात भरीव कामगिरी करतोय. अगदी चंद्रावर पोहोचेपर्यंत मजल गेलीय आपल्या शास्त्रज्ञांची इथेही महिला आहेतच, ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट!

विषय हा येतो की जर सर्वच क्षेञात प्रगती होऊ शकते, आपले सरकार जर या सर्व गोष्टींमध्ये भारताला अग्रस्थानी आणु शकते तर मग जेव्हा स्ञियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा का विविध प्रकारचे तंत्रज्ञान उदयास येत नाही? आपल्या देशाची IT सिस्टिम खुप पुढे गेली आहे़, ताकद आहे ना आपल्या भारतातील शिक्षित पिढित की ते अशी यंञणा प्रस्थापित करू शकतील की ज्याने या गुन्हेगारी विश्वाला कायमचा आळा बसेल अशी यंञणा जी कोणताही अतिरेकी काय जगातली कोणतीही सुरक्षा व्यवस्था तोडु शकणार नाही.
  नुसती 'मुलगी,शिकली प्रगती झाली', 'पहिली बेटी,धनाची पेटी', 'मुलगी वाचवा...' इ. इ. या घोषणा देताना आपल्या मनात हा ही विचार आला पाहिजे की जन्म घेणाऱ्या त्या 'लक्ष्मीरूपी पावलांना' या जगात सुरक्षित आयुष्य कसं मिळेल. त्यांच्या आयुष्याला गालबोट लागेल अशा रूढी परंपरा, अरिष्ट चालिरिती व माणसातील वाईट विचारसरणीतुन उद्युक्त झालेला राक्षस कसा नष्ट होईल? हा असा विचारमंञ माझ्या देशातील जनमानसात रूजेल ना तेव्हा मी म्हणेल 
                  माझा भारत, सुरक्षित भारत!

काही दिवसांपुर्वी काही ओळी वाचण्यात आल्या होत्या, त़्या इथे योग्य लागु पडतात असं मला वाटतं. हिंदीतल्या त्या ओळी...

'कोई भी देश तरक्की के शिखर पर तब तक नही पहुंच सकता जब तक उसकी महिलाएं कंधे से कंधा मिलाकर ना चले'!

मला वाटतं या 3 ओळीतच मी काय सांगायचा प्रयत्न करतेय हे तुम्हाला उमगलच असेल.....

आपली मातृभुमी ही सर्व सोयी-सुविधांनी सुजलाम् सुफलाम् आहे परंतु ती नियोजनबद्ध असायला हवी ना! तिथे कुठेतरी कमी पडल्यासारखं वाटतयं. यातुनच वाईट कृत्यांचा उदय होतो. योग्य ती माणसे जर आपल्या देशाच्या नियोजन प्रक्रियेत असली ना तर देशाचा सदैव जयच होईल आणि अत्याचार विश्वाला ही आळा बसेल.
म्हणुनच मी म्हणते ज्या वेळी देशातील प्रत्येक स्ञी सुरक्षित असल्याचं ती स्वत: समजेल ना त्या वेळी आपला भारत देश सर्व नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत किती तरी पुढे गेलेला असेल!

चला चला हो चला चला 
अश्या मातृभुमीकडे चला चला जिथे स्ञी शक्तीची इज्जत हो
कोणतीच मायबहिण आमुची बेइज्जत ना हो
भारत माते जननी आमुची 
तुच रक्षिणी या धरतीची
गंगा ,सरस्वती ,यमुनासम ह्या छवी पावन 
या स्ञी शक्तीची
मोड मान या मी युक्त गुन्हेगार राक्षसाची
पुन्हा निर्माण कर मनामनात भावना सुरक्षितेची!

अख्या जन्माचं मुळ म्हणजे स्ञी, तिचा महिला दिना पुरताच नाही तर रोज आदर व सन्मान करा आणि तिला सुरक्षितता वाटेल असच वातावरण निर्माण करा, ती खुलेल तिच्या मनाच्या विश्वातुन!
                             
                          ✒प्राची नाईक उंडणगावकर✒

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

स्वातंञ्यदिनविशेष


पुर्वसंध्या स्वातंञ्यदिनाची, 

नांदी असावी ही एका नव्या कोरोनोत्तर पर्वाची,

भारतमाते जननी आमुची,

तुच रक्षिणी या धरतीची,

मोड मान या कोरोनाची,

नव्याने रच कहानी या पावन भारतभुमीची,

वंदुनी तुजला साक्ष देते वचनाची,

जपेल तुला चाहुल लागताच संकटाची,

काळजी घेईल ग तुझ्या नैसर्गिक संपत्तीची,

हे माते गिळंकृत कर मती कोरोनाची.....

स्वातंत्र्यदिनाच्य पार्श्वभुमीवर, 

प्रयत्न करून सर्वांचे टोचतेय कान जरा, 

कोरोनाच्या नावाखाली माडलाय कुठे कुठे पैशांचा काळा बाजार, 

पैशांसाठी करताय निगेटिव्हही पॉझिटिव्ह 

या सर्वात माञ खरा कोरोनाबाधीतांचा निघतोय जीव

नाही ना आपल्या देशाते हे संस्कार मग खऱ्या कोरोनायोध्दयांना  तुमच़्या वागनुकीने नका करू बदनाम

जे करताय आपल्या देशासाठी प्राणाची बाजी लावुन काम त्यांना तर कोट्यावधीही कमी पडतील एवढे सलाम

कोरोना आहे जरी एक मोठी महामारी,नाहीच पडु देणार देणार यापुढे आपली ईच्छाशक्ती अपुरी

विनंती तुन्हा सर्वाना पैसा नाही सर्वस्व देश  सांगतो आपला नातेच सर्वश्रेष्ठ, कोरोना होतोच बरा हीच आस बाळगा

शपथ घ्या स्वातंञ़्यदिनी एकजुटीनी त्याला पळवा...

भारतीय स्वातंञ्यदिनाच्या संपुर्ण राष्ट्राला मन:पुर्वक शुभेच्छा

स्वांतञ्यासाठी झटलेल्या प्रत्येक महामानवाला व रणरागिनी स्ञीशक्तीला माझा मानाचा मुजरा व ञिवार वंदन..! 

स्वातंञ्यदिन चिरायु होवो  🙏🙏

।।भारत माता की जय।।

-प्राची नाईक उंडणगावकर

लग्नसराईत लपलेला धोका: वर्धा लव्ह जिहाद स्टोरी

लग्नसराईत लपलेला धोका: वर्धा लव्ह जिहाद स्टोरी लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला सर्वांगसुंदर असा प्रसंग असतो. सध्या उन्हाच्या तडाख्यातही लगी...