आज पासून सुमारे १९० वर्षांपुर्वी एका महान पुरुषाने मराठी अस्मितेला देशाच्या चौथ्या स्तंभाची ओळख करुन दिली. हा दिवस होता ६ जानेवारी १८३२. मराठीतील पहिले वृत्तपत्र 'दर्पण' हे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या लेखणीतून साकारले. समाजात जेव्हा ते वावरायचे तेव्हा अनेक समस्यांना तोंड देणारा वर्ग, अनिष्ट चालिरितींच्या गाळात फसणारे निरक्षर लोक आणि बहुतेक गोष्टींमुळे समाजात पसरलेली अस्थिरता आचार्यांना बघवत नव्हती. याच सर्व गोष्टींविरोधात कोणत्यातरी माध्यमातून वाचा फोडता यावी आणि विचारांच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण व्हावी या संकल्पनेतून त्यांनी दर्पणला जन्म दिला.
सुरुवातीला जरी जनमाणसाला या नव्या माध्यमाची ओळख जरा रुचायला वेळ लागला तरी हळुहळू यातून सकारात्मक बदल दिसायला लागला. या एका वृत्तपत्रातून भाषेची, लेखणीची ताकद काय असते, हे त्या काळापासून ते आता पर्यंत आपण अनुभवतो आहोत. खरंतर नुसतं अनुभवण्यापेक्षा प्रत्यक्षात आपण ते जगत आहोत. तेव्हा झालेला पञकारिता विश्वाचा जन्म आज कोणत्या प्रवाहाकडे वाटचाल करतोय हे बघताना माञ अनेक पैलू उलगडतात. ज्या मुल्यांच्या पायाने पञकारिता रचली गेली ती पञकारिता खरच आज जिवंत आहे का? आज पञकारिता कोठे आहेतॽ पञकारांना खरच अभिव्यक्त होता येतं काॽ असे अनेक प्रश्न सध्या पञकारांच्याच डोक्याला भुंगा लावताय. जे नव्याने या क्षेत्रात येवू पाहता आहेत, त्यांच्यासाठी पुढे पञकारिता क्षेत्र कसे असेलॽ हाही एक मुद्दा आजच्या मराठी पञकार दिनाच्या दिवशी विचार करण्याजोगा आहे.
१९० वर्षात पञकारितेचे स्वरुप कोड्याच्या ठोकळ्यासारखे बदलत गेले. प्रत्येक वर्षी एक नवीन रंग त्यात येतोय आणि हे कोडं न उलगडणारं आहे. आता बघा ना, सुरुवातीला काळ्या पाढंऱ्या रंगातील वृत्तपञाची रंगीत वृत्तपञाने जागा घेतली आणि याच वृत्तपञातील बातम्या दृकश्राव्य माध्यमातून पुढे आल्या. आता तर सोशल मिडियाच्या दुनियेत तर दर सेकंदाची अपडेट आपल्या एका क्लिकवर बघायला मिळतेय. कुस बदलावी तसा पञकारितेचा विकास होत गेला. छपाई माध्यमांचे अस्तित्व टिकेल का? हा प्रश्न या झपाट्याने होणाऱ्या विकासावरुन पडला तरी दर्पणाची सुरुवात ही छपाई माध्यमातूनच झाली. सगळ्या माध्यमांचा पाया म्हणजे छपाई माध्यम! जरी स्रोते वाचण्यापेक्षा बघण्यावर, ऐकण्यावर भर देत असले तरी अजूनही वर्तमानपत्र वाचल्याशिवाय अनेकांची सकाळ प्रसन्न होत नाही. पञकार घडतो तो छपाई माध्यमातूनच. त्याची लेखणी तिथेच तळपते. पञकारितेचे स्वरुप जरी दिवसेंदिवस बदलत गेले तरी छपाई माध्यमातील पञकारिता सदैव जिवंत राहिल यात काही दुमत नाही.
पञकार म्हटलं की कुणाच्याही तोंडातून बाहेर पडणारे दोन शब्द म्हणजे 'समाजाचा आरसा'! आरसा हा खरा चेहरा समोर आणतो. आपण जगाशी बेसुमार खोटं बोलू शकतो पण आरश्यात बघितलं की स्वतःशी माञ खोटं बोलल्याची लाज वाटतेच ना! तेव्हा माञ आपल्याच नजरेला नजर भिडत नाही; परंतू पञकाराला समाजाचा आरसा म्हणून संबोधन माझ्या विचारसरणीला न पटणारं आहे. कारण आरसा हा जरी प्रतिबिंब दाखवत असला तरी तो ते उलटं प्रतिबिंब दाखवितो. उजवी बाजु डावी तर डावी बाजु ही उजवी तसेच ३ चे ६ ही किमया आरसाच करतो. असा काहीसा तो आरश्याचा खेळ. पञकार हा पारदर्शी असावा, पञकाराची लेखणी तलवारीप्रमाणे धारदार असली तर त्या लेखणीच्या तीक्ष्णतेतून बदलाचा सुर्य दिसतो. पञकारितेचं शिक्षण घेवून ऑफिसमध्ये बसून राहून काम करणं म्हणजे पञकारिता नव्हे तर त्यासाठी आधी हाडाचा पञकार व्हावं लागतं. अंगी फक्त पञकारिता ह्याच रक्ताची साठवण करावी लागते. जेव्हा पञकाराच्या दृष्टीला समाजाची दृष्टी लाभेल, त्याला दु:ख, वेदना, हालपेष्टांची जाणीव होऊन तो अखंडीत त्या कार्याला वाहून देईल तेव्हा खऱ्या अर्थाने हाडाचे पञकार निर्माण होतील. एका पञकाराला परिपुर्ण होण्यासाठी अनेक प्रसंगांतून जावं लागतं. नव्याने स्वतः चा शोध घेत निर्भीडपणे समाजासाठी उभं रहायचं असतं. या प्रवासात अनेक दिव्य त्याला भेटतात आणि आजच्या युगात त्या दिव्यातून जे पञकार जातात, त्यांना माञ त्यांची अभिव्यक्ती गमवावी लागते किंवा त्यावर मर्यादा येवून ती थांबवली जाते. जरी या गोष्टीवर मुक्तपणे बोललं जात नसलं आणि बोलूनही परत त्या दिव्यांना तोंड देण्यामध्ये काही अर्थ दिसत नसला तरी आजच्या पञकारितेतील हे वास्तव चिञ आज स्पष्टपणे दिसतंय; पण त्याला धुसर करत पञकारितेचा गाडा पुढं चाललाय आणि याच विषयाच्या अवतीभवती वर उपस्थित केलेले सर्व प्रश्न आहेत.
अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी जांभेकरांनी वृत्तपत्र छापले. देश बदलण्यासाठी टिळक, आगरकर, अनंत भालेराव यांनी जांभेकरांनी दिलेली लेखणी हाती घेत उत्तम पञकारिता करत आपल्या रोखठोक शैलीतून लोकांना दिशा दिली. निरपेक्ष आणि समाजभान राखणाऱ्या पञकारितेतूनच आज आपल्याला एक अमूलाग्र बदल दिसतोय; पण तोच पञकारिता क्षेञाचा वारसा पुढे नेतांना माञ पञकारांचा आवाज माञ दबतोय. इच्छा नसूनही त्यांना चुकीच्या गोष्टींसाठी दुसऱ्यांचे विचार मांडावे लागताात असं वाटतंय. आजची पञकारिता कोठे आहे? तर खरंच पञकारासारखा विचारी माणूसही विकला जातोय हे एकणंही किती मनाला चटका लावून जातं. जो पञकार हा समाजाचा आवाज असायला हवा तो बड्या लोकांकडून मॅनेज होतांना दिसतो. यामुळे खऱ्या पञकारांचा माञ जीव जातो. पञकार हा नुसताच त्याच्या प्रोफेशनपुर्ता पञकार नसतो तर तो मनाने आणि जीवाने पञकारिता जगत असतो. काही अपवाद असतात जे या निष्पक्ष पञकारितेचा अवमान करत पैशासारख्या विषाला बळी पडतात. म्हणून आजच्या काळात पञकारितेचे स्वरुप जरी सोपे झाले असले, ते आपल्या मोबाईल वर आले असले तरी खऱ्या पञकारांसाठी माञ खुप आव्हानं आहेत. पण हाडाचा पञकार त्या आव्हानांचा सामना करत आपली परिसीमा गाठतोच आणि हे बळही पञकारिताच देते. अनेक वर्षांपुर्वी वृत्तपञांपुरतीच मर्यादित असलेल्या पञकारितेने आज अनेक माध्यमे काबीज केली आहेत. रोज नवनवीन पञकारितेचे दरवाजे खुले होत आहेत आणि ह्या प्रवाहाचा समुद्र होतोय. समुद्र व्हावा तो अगदी अथांग व्हावा माञ पञकाराला आणि त्याच्या पञकारितेलाच लुप्त करेल एवढाही तो अथांग नसावा असं प्रांजळपणे वाटतं.
आज अनेक बड्या मराठी पंञकारांनी आपल्या शैलीतून पञकिरितेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे; पण तरीही ती कुठेतरी एकाच बाजुने मागच्या काही काळापासून झुकलेली दिसते आहे. याला कारण म्हणजे पञकारितेतील राजकीय हस्तक्षेप. आपण चुकीचं केलं तरी जनतेपर्यंत माञ आम्ही किती चांगलं काम करतो हेच दाखवण्यात यावे असा त्या हस्तींचा आग्रह असतो. ज्या व्यक्तीमुळे वृत्तपञ किंवा डिजिटल माध्यमांना, दुरचिञवाहिन्यांना चांगल्या प्रतिच्या जाहिराती मिळत असतील त्यांच्या विरुद्ध बातम्या न छापणे किंवा लावणे ही एक पहिली माध्यमांची अटच झाली आहे. जर या अटींविरुध्द जाऊन पञकाराने एक चांगले काम केले तर आजकाल त्याला पाकिट हातात देऊन घरचा रस्ता दाखविला जातो अशी परिस्थिती आहे.
जशी पञकारांना काही बाबतीत अभिव्यक्ती नाही मिळत याउलट अनेक पञकार किंवा काही लोक पञकारितेचा गैरवापर करतांना दिसतात. पञकारितेच्या नावाखाली सामान्य जनतेकडून पैसै उकळतात. उगाच पञकारितेचं वजन दाखवत चांगले काम बंद करतात. यामुळे पञकारिता या क्षेञाचा निरादर तर होतोच; पण पञकारांबद्दलचा विश्वासही हलतो. पञकार हा जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी लढणारा एक योध्दा आहे; जनतेवर राज्य गाजवणारा हुकूमशहा नाही. अशा उगाच पञकारितेच्या नावाखाली जनतेला, सरकारला ञास देणाऱ्या खोट्या पञकारांना आवर घालणे गरजेचे आहे. मराठी पञकारितेची अस्मिता जपुन ठेवणे हे पञकारांचे कर्तव्य आहे. तेव्हाच ते कर्तृत्व गाजवू शकतात.
मागच्या दोन वर्षांत कोरोना नावाच्या विषाणूने सर्वच क्षेञावर कब्जा केला. त्यातून पञकारही सुटले नाही; पण ते थांबले नाही. कोरोनासारख्या राक्षसाचा वार निधड्या छातीने अंगावर घेत अत्यावश्यक सेवा देत त्यांनी लोकांपर्यंत बातम्या पोहोचवल्या. ताळेबंदीत सामान्य जनतेला मदतीचा हात दिला. ताळेबंदी असतानाही रस्त्यावरचे हाल लोकांना दाखविले, औषधांबाबतीतला काळा धंदाही समोर आणला आणि योग्य औषधं लोकांपर्यंत पोहोचवलीसुध्दा. यात अनेक पञकार बांधवांना कोरोनाने गिळंकृत केले. अशा कठीण प्रसंगातून सावरत परत एकदा सगळच उभं रहात होतं; पण जशी डोळ्याची पापणी लवते न लवते ओमीक्रॉन नावाच्या विषाणूचा प्रसार सुरु झाला आणि २०२२ चा उगवता सुर्यच ओमीक्रॉनचा शिकार झाला. राज्यसरकार ने परत निर्बंध आणत ज्ञानदानाचे विद्यापीठच ताळेबंद केलं. यावरुन सगळया विद्यार्थ्यांच्या मनात एकाच प्रश्नाने घर केलेे. कोरोना शाळा, महाविद्यालयातच जाऊन होतो का? भाजी मंडी, वर्दळीच्या जागांना तो घाबरतो का? आणि हे प्रश्न रास्त आहेत. याने शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांची मनं पार कोलमडून जात आहेत ओ! त्यांना त्यांचं भविष्य अंधाारात दिसतंय. या विषयाचा इथे काय संबंध? असा प्रश्न पडलाच असणार. तर आज पञकारिता दिनाच्या दिवशीच महाराष्ट्रात पञकारिता विभाग भावी पञकार विद्यार्थ्यांविना ओस पडलेले बघायला मिळाले. ज्या अभ्यासक्रमातून देशाचा चौथा स्तंभ घडतो, ज्या अभ्यासक्रमात जास्त महत्त्व हे संशोधनयुक्त अभ्यासपध्दतीला आहे, तोच पञकार विद्यार्थी आज कोरोनामुळे घरी बसतोय. मग त्यांना पदवी मिळाल्यानंतर पुढं काय? कसा असेल त्यांचा हा प्रवास. प्रत्येक पञकार प्रत्यक्ष कृतीतून घडत असतो. त्याच्यातील गुणांची पारख करत महाविद्यालयच त्याला योग्य दिशा देतं मग ही महाविद्यालयं जर बंद झाली तर मग पुढे याचं भविष्य काय? जर दहावी बारावीचे वर्ग चालू असू शकतात तर पदव्युत्तर शिक्षणाला काहीच महत्व नाही का? या निर्णयातून तर हेच दिसतय. शोधला की पर्याय हा सापडतोच; पण या सगळ्यात विद्यार्थ्यांना माञ चुकीच्या निर्णयांना बळी पडावं लागतयं. आज पञकारितेत येवू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त एकलव्य होवून शिक्षण घेत आपण देशासाठीचं देणं लागतो, हे सिद्ध करावं लागणार.
हे क्षेञ खरच खुप जादुमय आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सर्वार्थाने विकास होतो आणि मगच तो पञकारितेसाठी सक्षम होतो. यात सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे पञकार सदैव एक विद्यार्थी असतो जो सर्व क्षेञातील ज्ञानामृत पीऊ शकतो. जो थांबला त्याला पञकारितेत पुढे जाणं उमजत नाही. मराठी पञकार दिनाच्या या १९० व्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व पञकार हे देशाच्या चांगल्या भवितव्यासाठी, मराठी पञकारिता अजून बळकट होण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांचे पाईक आहेत. ही शपथ मनात रुजणे महत्वपूर्ण आहे. म्हणजे परत एकदा तरल पञकारितेतून जनविकास साधता येईल!
देशाचा चौथा आधारस्तंभ मजबूत होईल हीच आशा...
पञकारांच्या प्रत्येक स्वप्नाला प्राप्त होवो सदैव एक नवी दिशा...
ऊन, पाऊस, वादळ, वारा...
सोसून उभा राहू दे पञकार न्यारा..
नवा आयाम पञकाराचा व्यापू दे विश्व सारा..
नव्या विचारांची नवी धारा..
निष्पक्ष पञकारिता हाचा असो पञकारांचा नारा....!
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन आणि सर्व पञकार बंधू-बघिनींना पञकारदिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा.....!
🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️
अतिउत्तम , खूप छान
उत्तर द्याहटवाKhup mast 👍👍👍
उत्तर द्याहटवाखुप छान लिहिलं आहेस प्राची..👌
उत्तर द्याहटवाVery informative
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाखुप छान, प्राची.. सुंदर आणि माहितीपूर्ण लिहिलस तू.. 👍 उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा..
उत्तर द्याहटवाखूप छान प्राची पत्रकारानी कसे असावे याची उत्तम मांडणी केलीस
उत्तर द्याहटवा✍️👌🏻
खुप छान लिहिलंय आणि सत्य परिस्थिती मांडली आहे.....
उत्तर द्याहटवाKhup chan Prachi 👍
उत्तर द्याहटवावास्तवदर्शी मांडणी केलीस प्राची✍️
उत्तर द्याहटवाKhup chan lihlay prachi... You choosed right path for you , all the very best dear
उत्तर द्याहटवाVery nice👍👍
उत्तर द्याहटवाNice 👍👍
उत्तर द्याहटवाअतिशय उत्तम रितीने भाषेचा वापर करून सत्य परिस्थितीला हात घालण्याचा अत्यंत उत्कृष्ट काम.
उत्तर द्याहटवा