२१ व्या शतकातही विखुरलेला, तरीही लोकबुध्दीतून उत्पत्ती झालेल्या जातीयवाद, दंगली, वर्णभेद, धर्मभेद, वंशभेद, कुटीर राजकारण, स्वार्थी वृत्ती अशा असंख्य पारतंञ्याच्या बेडीत सद्यस्थितीला बंदिस्त झालेला माझा महाराष्ट्र खरच आता होरपळतांना दिसतोय मनुष्यातील सत्ता, श्रामंती, लालसेच्या अतिशयोक्तीपुर्ण हव्यासात! अखंड परिश्रमांच्या पराकाष्टेतून मराठीच्या करुण मातीत महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. सबंन्द देशात नसावे असे महान राष्ट्र , परिपूर्ण असे राज्य जे आपल्यातच एक महाराष्ट्र म्हणून देशाच्या नकाशावर शानेने तोल सांभाळत उभं आहे..
तोच माझा महाराष्ट्र बलदंड असा इतिहास कदाचित पुसट करतोय...
विसरतोय त्या मातीसाठी जीवाचे रान केलेल्या महाराष्ट्र प्रेमींना आणि चालला फक्त पुढे घड्याळाच्या आणि स्वार्थी वृत्तीच्या मार्गावर....
पण; कितीही केलं तरी शेवटी राज्यच ते! कधीतरी उठेलच की पेटून पण वेळ तर नसेल न गेलेली तेव्हा आपल्या दवडून?
म्हणूनच .......
वाटला विचारावा प्रश्न माझ्या महाराष्ट्राला??
मराठीच्या मातीत जन्मलेल्या माझ्या महाराष्ट्रा...
कसा रे अडकलास जातीयवादाच्या चक्रव्युवहात तू?
सतांच्या शिकवणीतून घडलेल्या माझ्या महाराष्ट्रा...
कसा रे लोटला गेलास भ्रष्टाचाराच्या घाणीत तू?
छञपतींचा इतिहास जागता ठेवणाऱ्या माझ्या महाराष्ट्रा...
कसा रे केलास स्वत:चा औरंगजेब तू?
ग्रामीण संस्कृतीचे जाते दळणाऱ्या माझ्या महाराष्ट्रा
कशी पाडलीस दरी गाव शहरातील संस्कृतील तू?
व्हावे राष्ट्र महाराष्ट्र म्हणून युक्तीतून शक्तीत लढणाऱ्या माझ्या महाराष्ट्रा....
का पाडलाच कलश त्या एकात्मतेचा तू?
छञपतींसहित ,फुले शाहू , आंबेडकर ,टिळकांच्या जडणघडणीतून साकार झालेल्या माझ्या महाराष्ट्राला...
कसा रे शिक्षणात लाजिरवाणा झालास तु?
कसा रे बलात्कारात अव्वल ठरलास तू?
गर्व अभिमान असणाऱ्या माझ्या प्रिय महाराष्ट्रा कुठे हरवला तुझ्यातील देशभक्तीचे सप्तसुर
असा नव्हता माझा महाराष्ट्र..
कधीच नव्हते ईथे कुणीच भ्रष्ट....
संत ,महंत,समाजसुधारक..
घडले इथेचसाहित्यातील नोबेल धारक...
अशीच माझ्या महाराष्ट्राची देशभरातील पारख...
समुद्राच्या खोलापरी जागत्या इतिहासाची साक्ष घेणाऱ्या माझ्या महाराष्ट्रा...
खडबडून जागा हो , वात अजून तेवतेय...
दे स्वरुप तिला मशालीचे अन् लाव आग त्या तुझ्याच बहुरुपी रुप घेतलेल्या महाराष्ट्राला न मुक्त हो तुझ्याच नवनिर्मितीसाठी...
जग त्या मराठी जननी साठी....
वाहून ने वारे तडीपार नकारात्मकतेचे
येवू वादळ जातीमुक्त , भ्रष्टाचारमुक्त सकारात्मकतेचे
यूवू दे वादळ तुझ्यात निर्माण झालेल्या इतिहासातील त्या लढवय्या, शुरस्त क्षणांचे
जागे कर तनमन धन या समस्त महाराष्ट्र प्रेमींचे..
शेवटी.....
अखंड माझ्या महाराष्ट्र देशा....
खुंटलेल्या प्रगतीला नितळ यशाचा दोरबांध...
घडलेल्या घटनांचा वेळीच चारा बांध...
समानतेचे व्रत रुजव ते महाराष्ट्र प्रेमींच्या आरपार...
स्ञी सक्षमतेला स्विकार करण्याची त्याच्या मनाला दे एक धार...
धुळीतल्या राजकारण्यांना धुळ चार...
स्वयंप्रकाशातील प्रेरणेच्या रस्त्यावर कर अखंड वाटचाल...
कर अखंड वाटचाल....
प्रिय आमुच्या महाराष्ट्रा, तुच आहेस देशोन्नतीच्या कार्याचा एक प्रखर ललकार....
एक प्रखर ललकार...!
🖋️प्राची नाईक उंडगावकर🖋️